मी ज्या मार्गाने यात्रा केली ती अजिबात कठिण नाही. यात्रेत ८०% अधिक पन्नाशिच्या पुढचे यात्रेकरू असतात. त्याच्या द्रुष्टीने दिल्या जाणाऱ्या सुचना जरा अधिक काळजी करायला लावणाऱ्या असतात. प्रत्यक्षात परिक्रमा तीन दिवस - ५२ किलोमीटर - चालण्याची आहे. त्यातही दुसरा दिवस महत्त्वाचा. कारण १६००० ते १९००० फुटापर्यत चढून परत १५००० फुटापर्यत उतरणे व नंतर सपाटीवरून १८ कि.मी. चालणे आहे. सवय नसल्यामुळे हा भाग पार करणे त्रासदायक ठरु शकते. येथे तिबेटी लोकांचे पुर्णपणे वर्चस्व आहे. चिनी पोलिस येथे अजिबात दिसत नाहीत. काशी विश्वेश्वर वगैरे ठिकणी जसे ब्राह्मण लोक भाविकाना पिळतात तसे इथे तिबेटी लोक. जे लोक घोड्यावरून यात्रा करतात त्याना खुप घाई करतात. तसेच तरुण मुली असतील तर एकटी पाहुन बऱ्यापैकी अंगचटीस जातात.

या पैकी मानसरोवर आणि तेथून दिसणारा कैलास मात्र फारच अप्रतिम.मानसरोवराचे पाणी चविलाही छान आहे आणि त्या थंडीत स्नान करायालाही.रात्री आकाश स्वच्छ असेल तर चांदणेही टिपूर असते. त्याची प्रखारता काही वेगळीच असते.