बहुतेक आपल्यालाच हा फटका बसलेला दिसतोय त्यामुळे इतक्या पोटतिडीकेने बोलताय.
खरंतर सर्वच मालिका रटाळ आणि मूर्खपणाने भरलेल्या असतात. पण मग फक्त एकाच मालिकेवर घसरायचं कारण? या सुखांनो या चं निमित्त करून विक्रम गोखल्यांवर टिका करायची हौस भागवली जातेय असं वाटतंय. कुठलीही मालिका कशी जावी हे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि त्यापेक्षाही चॅनेलवर अवलंबून असतं हे आपल्याला माहित नसावे असे वाटते. गोखले हे व्यवसायाने अभिनेते आहेत आणि प्रत्येक वेळेस केवळ अत्युत्तम भूमिका आणि अत्युत्तम कथा असेल तरंच मी काम करीन हे चोचले शक्य नसतात, उपाशी मरायची वेळ येईल नाहीतर. हो त्यांच्याइतक्या ज्येष्ठ (तुम्हाला हे मान्य नाही हे उघडच आहे पण आमचं मत जरा वेगळं आहे) कलाकाराला सुद्धा पैसा मिळवण्यासाठी कामाच्या दर्जामधे तडजोड करावी लागते.
मोबाईल आणि नाटक बंद करण्याबद्दल... अनेक वेळेला विविध पद्धतीने विनंत्या करून मोबाईल बंद होत नाही तेव्हाच कुणी कलाकार या टोकाला जातो. कितीही विनंत्या करूनही निर्लज्जपणे आपले मोबाईल चालू ठेवून बिंधास्त गप्पा मारत बसणारे अनेकजण मी पाह्यले आहेत. सहनही केले आहेत प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणूनही. अश्यांचं करायचं काय? कलाकाराचं लक्ष डळमळीत होतं त्यामुळे समोर घडत असलेलं नाटक बिघडतं आणि मग हेच मोबाईल वर बोलणारे उद्धट (कलाकाराने विनंती करूनही फोन चालू ठेवणाऱ्याला दुसरा शब्द नाही) महाभाग नाटकाला आणि कलाकाराला नावं ठेवायला मोकळे. म्हणजे चूक ह्यांची आणि खापर कलाकाराच्या डोक्यावर? का बरं? असल्या लोकांमुळे आपलं नाव खराब करून घेण्यापेक्षा प्रयोग बंद केलेलाच बरा. निदान धास्तीने का होईना लोक पुढच्या वेळेस मोबाईल बंद ठेवतील.