वरील टिप्पणीशी असहमत आहे.

'नकळत सारे घडले' च्या शिवाजी मंदिरात झालेल्या प्रयोगाच्या वेळी विक्रम गोखले एक नाही तर दोन वेळा असे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. आणि ते सुद्धा प्रयोगाच्या आधी स्वत: प्रेक्षकांन योग्य ती विनंती केल्यानंतरही. मात्र तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी नाटक थांबवले आणि प्रेक्षकांचा समाचार घेतला. हे त्यांनी योग्यच केले असे माझे मत आहे. प्रेक्षकांनी काय करावे आणि काय करू नये, ही चर्चा येथे करत बसत नाही; कारण तो समंजसपणाचा भाग आहे, आणि समंजसपणा शिकवता येत नाही, असे मला वाटते. असो.

मालिकेवरील चर्चा यापेक्षा अधिक भरकटू न देण्याची ज़बाबदारी चर्चेकऱ्यांनी तसेच चर्चेस सुरुवात करणाऱ्याच्या नात्याने बोकेरावांनी घ्यावी आणि चर्चा पुढे सुरू ठेवावी, अशी सूचना करावीशी वाटली. त्यासाठी हा प्रतिसादप्रपंच.