पावसावर अशी कविता माझ्या याआधी पाहण्यात आलेली नाही. वेगळेपण उठून दिसते.

कडाडणाऱ्या विजेस धरणी थिजून पाही

समीप विध्वंस ठाकल्याची नृशंस ग्वाही

फिरून आला ऋतू धरेच्या समर्पणाचा

या ओळींमधून धरणीची असहायता प्रकट होतेय. नेहमीची गोड-गुलाबी कविता नाही ही. त्यामुळे प्रथमदर्शनी पचायला अवघड वाटली. असहाय धरा आणि अत्याचारी पाऊस असा मी अर्थ लावला आणि माझे मलाच वाटले की या भूमिकेत पाऊस आणि धरेला बघणे मला फारसे आवडले नाही. पण रौद्र - बीभत्स हे रस खरे खुरे आहेतच, ते लेखनात आलेच पाहिजेत. त्यांना टाळणे हा पलायनवाद झाला. म्हणूनच आपल्या लेखनाचे खूप कौतुक वाटले.

अभिनंदन

-प्रभावित