अज्जुकाजी,
चर्चेचा विषय झी मराठीवरच्या रटाळ मालिका असा आहे. "या सुखांनो या" ही मालिका उदाहरणादाखल दिली. विशेष करून शीर्षकगीत, विक्रम गोखले आणि बाकीचे बरेच श्रेष्ठ कलाकार असल्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. दुर्दैवानं ती मालिका सगळ्या जास्त रटाळ निघाली. जो भाग वर्णन केलाय (काल परवा झाला) त्यानं तर अंत पाहिला.
मी विक्रम गोखलेंच्या तिरसटपणाचा अनुभव घेतलाय एका प्रयोगाच्यावेळी. मागच्या रांगेत बसलेल्या कुणा एका प्रेक्षकाचा मोबाईल वाजला आणि गोखलेंनी चक्क नाटक थांबवलं. बऱ्याच दिवसांनी आलेलं चांगलं नाटक पुढच्या रांगेचं तिकीट काढून बघायला जाऊन (विशेष करून गोखलेंचं नाटक म्हणून आवडीनं गेलो होतो) ऐन रंगात आलं असताना ते मधेच थांबवलं गेल्यामुळं खुपच विरस झाला. शेजारच्या सीटवरून गेले त्यांना काही अपशब्द आणि झाल्या मलाही गुदगुल्या. लिहिलं मी दोन-तीन ओळी त्याबद्दल. अज्जुकाजी, तुम्हाला का हो त्याचा एवढा त्रास? मुख्य विषय सोडून तेवढंच खुपलं का डोळ्यात? बरं, एवढं खुपलं की तुम्ही तुमच्या प्रतिसादाचा विषय "आपणच का ते?" असा लिहिलात.
अज्जुकाजी, उलट सुलट प्रतिसाद अपेक्षित आहेत. पण तुमचा प्रतिसाद हा चर्चेच्या विषयावरील प्रतिसाद कमी आणि व्यक्तिगत जरा जास्त वाटतोय. तेव्हा तुम्हाला चर्चेव्यतिरिक्त माझ्यावर काही टीका वगैरे करायची असेल, तर कृपया व्य. नि. चा लाभ घ्यावा ही विनंती. चर्चेत व्यत्यय नको.
बाकी तुमचे असे भांडखोर प्रतिसाद मनोगतावर इतरत्रही कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. तेव्हा या य:कश्चित अतिसामान्याला माफ़ करा आणि मुख्य विषयावरील चर्चा पुढे जाऊ द्या.
आपला कृपाभिलाषी,
खादाड बोका