द्वारकानाथजी,

आपण म्हणता त्याप्रमाणे "सत्पुरुषांच्या सान्निध्यात राहून ग्रंथ अभ्यास "हे आता स्वप्नवत झाले आहे. नोकरीनिमीत्ताने जे स्थलांतरीत झाले आहेत अश्या जिज्ञासू लोकांस ग्रंथ हाच मोठा आधार आहे. शिवाय शक्य तेव्हा तज्ञांशी चर्चा करुन अधिक गर्भितार्थ समजून घेणे हे सुद्धा आवश्यक आहे असे मला वाटते.

केबल टीव्हीवर काही प्रवचनातून बोध होतो पण असा तुकड्या तुकड्याने केलेला अभ्यास कितपत उपयुक्त आहे याबद्दल मी साशंक आहे.

त्यामुळे गाडी पुन्हा फ़िरून ग्रंथवाचन आणि त्यावर मनन / चर्चा ह सध्या उपलब्ध मार्ग आहे. वाचकांना अधिक मार्ग सुचल्यास कळवावा.

विनम्र- शशांक