इथल्या एकाच चांगल्या पद्धतीचा उल्लेख केला होता. त्यावरून
".....इथल्या (परदेशातल्या) प्रत्येक गोष्टीची (चांगल्या/वाईट) भारतातील वस्तुस्थितीशी सगळेच जण तुलना करत असतात. इथे (परदेशात) सगळं 'किती छान' म्हणायचं आणि तेच आपल्या देशात 'किती घाण' असं म्हणुन नाक मुरडायचं, हे काम इथं(परदेशात) आलेले बरेच जण अगदी चोखपणे करत असतात. त्यात नवीन काय? ..."
आपणच असा जेनेरीक निष्कर्ष काढलात. मला हया मुद्द्यावरून वाद वाढवता येईल पण ही चर्चा ती जागा नव्हे.
सभा समारंभात किंवा इतर सार्वजानिक ठिकाणी आपली लोकं मोबाईल-संकेत (मॅनर्स) पाळत नाहीत हे मी अनुभवलं आहे आणि मला ते चुकीचं वाटलं म्हणून लिहिलं. निदान २००५ मधे पुण्यात होतो तेव्हाचे हे अनुभव आहेत. आता परिस्थिती बदलली असल्यास किंवा असं वागणंच शिष्टसंमत झालं असल्यास माहीत नाही.
शेवटी.. मूळ विषयाशी कमी संबधीत असा प्रतिसाद देण्याचा खटाटोप का? तर, लोकांच्या अश्या वागण्याचं समर्थन आणि त्यांना विरोध करणारे ते 'उर्मट' ही तर्कसंगती पटली नाही म्हणून. एक बरं वाटलं कि असाच विचार अनु, अज्जुका यांनीपण केला म्हणजे असं वाटणारा मी एकटा नाहीतर.
वाद व्यक्तीशः (पर्सनली) घेतला नाही, आपणही तो घेऊ नये, ही विनंती. :)