पुण्यात कुठे मिळते त्या जागांची यादी जरा कृपया इथे टाका. पुढल्या वेळी पुण्यास जाईन, तेव्हा जरूर त्यातील जमेल त्या जागांना भेट देईन.

माझ्या लहानपणी आम्ही पुण्यात, स्टेशनजवळच्या बादशाही लॉजमधे जायचो. तिथल्या उत्तम जेवणाची चव अजून तोंडावर आहे.  त्या जेवणाचा थाट व ती चव अप्रतिम होती. विशेष म्हणजे तिथे तेव्हा मराठी खानावळीतली खास बसायची पद्धत -प्रत्येक व्यक्तिस स्वतंत्र छोटे संगमरवरी टॉप असलेले टेबल, (जे पुढेमागे सहजपणे करता येते) व अशा पद्धतिने मंडळी भिंतीला लागून लांबलचक ओळीत बसलेली- ही तर होतीच. तसेच पाटावर बसण्याचीही एक स्वतंत्र व्यवस्था होती. आणि जेवण खास ब्राम्हणी पद्धतिचे-- गरमागरम पोळ्यांवर तुपाची धार, घट्ट लागलेले दही, बीटची कोशिंबीर, वरण.... व्वा!!

अलिकडे बऱ्याच वर्षानंतर पुणात जायचा योग आल, तेव्हा धडपडत मी जेवण्यासाठी म्हणून तिथे गेलो. तर तिथे सर्व बंद झालेले आढळले. ती जुनी एक मजली इमारत अजूनही तशीच आहे, पण लॉज बंद झाले आहे! काहीतरी जवळचे अजून एक कायमचे निघून गेल्याची चुटपुट लागून राहिली.