वरील लेखाचा उद्देश मराठी साहित्य किती क्षुद्र, संकुचित आहे हे सांगण्याचा नक्कीच नाही. इंग्रजीशी तुलना केली तर ते तोकडे पडते (अपवादांनी अर्थातच नियम सिद्ध होतो), आणि वरील मुद्धा क्र. १ आणि २ मान्य केल्यास, तसे होणे काही प्रमाणात स्वाभाविक का आहे आणि त्यामुळे तुलना केवळ आत्मनिरीक्षणासाठी आणि शक्य झाल्यास सुधारणेपुरती मर्यादित ठेवावी; उगाच मराठीत शेक्सपिअर का नाही म्हणून गळे काढू नयेत असे मला वाटते.
ह्या मुद्द्याशी सहमत आहे.

अवांतर
मराठी शब्दांची संख्या इंग्रजी शब्दभांडारापुढे तोकडी आहे. (का आहे हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.) आमच्या मोठ्यातला मोठ्या शब्दभांडारात ८० हजाराहून अधिक शब्द नाहीत. तसेच इंग्रजीत वेगवेगळ्या अर्थच्छटा दाखवायला भरपूर शब्द आहेत. पण मराठीत तसे नाही असे मला वाटते. एखादी भाषा बोलणाऱ्या लोकांचे जेवढे मोठे विश्व तेवढेच मोठे त्या शब्दभांडार. मराठीही त्याला अपवाद नाही.

दुसरे म्हणजे मराठीची इंग्रजीशी तुलना करतानाच मराठीएवढेच विश्व असणाऱ्या प्रादेशिक भाषांशीही तुलना करावी. जसे बंगाली, कन्नड, मलयाळम. ह्या भाषांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, याचा विचार करावा.