ॡ, ॡ, ङ, ञ  यापैकी पहिली दोन कारिकांमध्ये ( शक्ॡ पच् मुच् रिच्) वापरली जातात. आपल्या वर्णमालेचा मूळ स्रोत संस्कृत असल्यामुळे व्यंजनांच्या प्रत्येक गटासाठी अनुनासिक व्यंजन त्या गटात शेवटी असते, उदा क, ख, या गटातील ङ्  च , छ , या गटासाठी ञ् , त, थ  या गटासाठी न ,ट ,ठ साठी ण , प, फ, साठी म . संस्कृतमध्ये अनुस्वाराऐवजी ही व्यंजने वापरतात. उदा. आपण सिंचन  लिहितो पण मूळ संस्कृत सिञ्चन , आपण आनंद लिहितो पण ते आनन्द , पंडित ऐवजी पण्डित असा या व्यंजनांचा उपयोग आहे. आपण अनुस्वार वापरत असल्यामुळे या अंत्य व्यंजनांचा काही उपयोग नाही असे वाटते. त्यातही न , ण , आणि म चा पूर्ण स्वरूपात वापर होतो त्यामुळे  ङ, ञ निरुपयोगी वाटणे सहाजिक आहे. वाङ्मय हा शब्द मात्र अनुस्वार वापरून लिहिला जात नाही.