मंडळी,
पुण्यातली खवैय्येगिरी हा मनमुराद लुटण्याचा एक आनंदोत्सव आहे. चितळेंची बाकरवडी आणि आंबावडी, वैशाली हाँटेलची शेव बटाटा दही पुरी, सुजाताची आंबा मस्तानी(हे २उल्लेख पुर्वी आले आहेत), वाडेश्वर भुवन चा उपमा, कावरे कोल्ड्रींक्स चे आईस्क्रीम व वाळा सरबत , बेडेकरांची मिसळ , कॅंपातली पावभाजी व चटणी सँडविच, लक्ष्मीनारायण चिवडा ही खवय्या लोकांची काही मर्मस्थाने किंवा पदार्थ.
गेल्या काही वर्षात (डायनिंग हाँल) खानावळींनी जम बसवला आहे. चित्त यानी दिलेल्या ५ नावात अजून भर म्हणजे रसोई (शनीवार पेठ), दुर्वांकुर (टिळक रोड).
विनम्र