माझा प्रश्न असा आहे की, असे का होते?
नक्की माहिती नाही, कदाचीत त्याला बेशिस्त सहन होत नसावी, ज्यांनी ते काम करावं ते कमी पडत असावेत असा विचार मनात येऊन करत असेल. गाडगेबाबानी नाही का स्वत:च झाडू हातात घेतला?
रस्यावरची रहदारी नियंत्रीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे त्याला का वाटले असावे? ह्या त्याच्या विचारांचा त्याच्यावर एवढा पगडा का बसला असावा? त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे की विरोध केल्यामुळे? (अर्थात शेवटी त्याला हवे होते ते त्याला मिळालेच असे त्याला वाटले असावे (असे मला वाटते!) म्हणजे त्यात त्याला यशही आले.
येनकेन प्रकारेण, जे काही तो करत असेल त्यामुळे वहातूक नियंत्रण होत असेल तर उत्तम
फुकट फौजदार म्हणजे काय? फुकट फौजदार असेच निर्माण होतात का? व्हावेत का?
परिणाम चांगले होत असतील तर व्हावेत.
पुढे नेते बनण्यासाठी विविध क्षेत्रात अशी फुकट फौजदारी केलेली फळास येते का?
माहिती नाही.
तुमचा काय अनुभव / विचार आहे?
फौजदारीचा अनुभव नाही (तशी तब्येतही नाही) , पुण्यात काही सेवाभावी संस्थांची माणसे कधी कधी काही चौकांवर वहातूक नियंत्रण करतांना दिसतात. वहातूक दिवे सुरू असले तरी आपण लोक चौकाचा मध्यभाग (जो एक वेळी एकाच दिशेकडील लोक वापरू शकतात) तेथे घुसण्यासाठी चढाओढ का करतो? 'राईट ऑफ वे' चा संस्कार आपल्यावर का नाही? जर मी तेथे आधी गेलो नाही तर मला कधीही इच्छीत स्थळी पोचता येणार नाही अशी भीती सगळ्यांनाच वाटते का? असे का होते? ह्याचे समाधान काय? जर आपले आपल्यावर नियंत्रण नसेल, तर, स्वत:हून पुढे येऊन हा 'राईट ऑफ वे' एकावेळी एका बाजूच्या वहातूकीस वाटणारा जर कोणी असेल तर आपल्याला त्याची आवश्यकता आहे.
अवांतर: पुढचा प्रश्न 'जर कायदा हातात घेवून वहातूक नियंत्रण करणे योग्य तर समाजातील कीड का साफ करू नये?' असा आहे का?