बिघडलेले पोट, घसरणाऱ्या विज़ारी, बाई-बाटली या सगळ्याच्या चाकोरीतून बाहेर पडून आलेले धमाल विडंबन. खूप आवडले.
पाव रोजचा इथे
मज मिळे न भाकरी!
बरेचदा येथे अशीच गत असते, पण सध्या याहूनही वाईट अवस्था आहे. राणीच्या देशात तुम्हांलाही असाच अनुभव आलेला दिसतो.
ढीग फार साचला
धूत जा कधीतरी
बेडरूममध्ये साचलेल्या लॉंड्रीची आठवण झाली. हा तुमचाही अनुभव तर नव्हे?
साळसूद का असा?
चाललोय सासरी!
वा! मस्त!
एकंदर (स्वानुभवातून उतरलेले?) विडंबन आवडले. शुभेच्छा.