मला वाटतं कि, फक्त वाहतुक नियंत्रणासाठीच नाही तर कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये आपणहोऊन सहभागी होऊन(आपला काहीही संबंध नसताना) त्या कामामधे आपला वाटा उचलणे याला फुकट फौजदारी म्हणत असावेत.!  वाहतुक नियंत्रण करणे, गणपती उत्सवामधे मिरवणूकीचे सारथ्य करणे, दोन लोकं  भांडत असतील तर मध्ये पडून ते मिटवण्याचा प्रयत्न करणे,  ही  काही उदाहरणे सांगता येतील.

ही माणसे असे कां करतात हे जाणून घेणे अतिशय मनोरंजक ठरेल, कारण, आताश्या अशी मंडळी कमी होत चालली आहेत. कारण, "मला काय त्याचे" ही वृत्ती वाढली आहे.

एक प्रकारे ही प्रवृत्ती  जागरूक समाजाचे प्रतिक होती असे वाटते. जाणकार यावर प्रकाश टाकू शकतील!!

प्रसाद