एका मनोगती सदस्याकडून ६ कविता पोहचल्या आहेत.
जेव्हा एकापेक्षा जास्त साहित्य एकाच विरोपातून पाठवले जाते तेव्हा या साहित्याची विषय व प्रकारावार सूचीही त्या साहित्याबरोबर पाठवावी.
सदस्यांना ही परत परत विनंती की हा चर्चा विषय वाचून आपण ज्यातून साहित्य पाठवता त्या इमेलचे शीर्षक कृपया आम्ही सांगितलेल्या साच्यात द्यायचा प्रयत्न करा.
आतापर्यंत आलेल्या साहित्यापैकी कोणीही हा विरोप शीर्षकाचा विषय साच्याबरहुकूम लिहीलेला नाही. या चर्चाविषयाचे अद्यावत प्रतिसाद नीट वाचून त्यातल्या सूचना लिखाण पाठवणाऱ्यांनी पाळल्या तर प्रेषक व संपादक या दोघांचाही त्यात लिखाणाची निवड य्या दृष्टीने फायदा होईल.
मनोगतावर व्यवस्थित नियम पाळून वावरणाऱ्या आपणा सर्व सूज्ञ वाचक-लेखकांना हे परत परत सांगणे न लगे.
आपले कृपाभिलाषी,
संपादक मंडळ.