माहितीबद्दल सर्वांचे धन्यवाद.
हा प्रश्न विचारतांना माझ्या डोक्यात चिनी भाषेतील काही वापरातल्या अक्षरांची तुलना होती, ती आता सांगायला हरकत नाही. 'नाही' अशा अर्थाचा एक शब्द म्हणजे 'ञ्हाय'. पिनयीनमध्ये (चिनी भाषा रोमन लिपीत लिहीणे) हे 'nhai' असे लिहीले जाईल. 'कृपया'ला शब्द आहे 'ञगाय्' (ngaai). तसेच इथे एक बरेच आढळणारे आडनाव म्हणजे 'ञंग' (Ng). म्हणजे ह्या भाषांत हा 'ञ' अजून बऱ्यापैकी वापरला जातो. दुसरे एक बरेच आढळून येणारे आडनाव म्हणजे 'ॡंग' (Leung)... इथे जीभ पन्हळीसारखी करून शब्दोच्चार करावा लागतो. अशा साधर्म्यामुळे मला असे वाटू लागले की आपण ही अशी मुळाक्षरे चिनीवरून तर घेतलेली नाहीत ना? हा प्रश्न बरेच वर्षे डोक्यात आहे, व तो मीच ओढूनताणून आणलेला दुवा म्हणून मागे टाकून दिला. पण काही वर्षांपूर्वी टिव्हीवर एका लघुपटात केरळातील एक नृत्यप्रकार व चिनी मार्शल-आर्टस् ह्यांमधील साम्यस्थळे दाखवली होती, ती बघून परत असे वाटले की तशीच काही देवाणघेवाण भाषेच्या बाबतीतही झाली असेल का?