अशी असावीतः
१. समाजसेवेची आवड: एखाद्या व्यक्तिला असली, तर बरेच मार्ग उपलब्ध आहेत. उदा. झोपडपट्टीमध्ये जावून कामे करणे, वेश्यावस्तीमध्ये जावून तेथील लहान मुलांना शिक्षण देणे, बालसुधारगृहात जावून कामे करणे इ. पण अशी बरीच कामी करण्यास एक हिम्मत लागते, मनाची तयारी लागते, तशी ती सगळ्यांपाशी असेलच असे नाही. तुलनेने असे काही (वाहतूक नियंत्रण वगैरे) करणे सोपे आहे.
२. अधिकाराची भावना. आपण वाहतूक नियंत्रीत करतो आहोत, ह्यातून एकप्रकारचा अधिकार गाजवल्याचा आनंद असतो. लहानपणी मला स्वतःला आगगाडीचा ड्रायव्हर व्हावेसे खूप वाटे. त्यात तांत्रिक आवड होतीच, पण आपण इतके हजार लोक बसलेले आहेत ती गाडी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेत आहोत, त्याचा एक सूक्ष्म आनंदही होता, असे मला वाटते.
३. लोकांचे लक्ष वेधून घेणे हे कारणही अगदीच नाकारता येत नाही.
प्रत्यक्षात ही कारणे स्वतंत्रपणे न येता, मिश्रीत स्वरूपातही असू शकतात.