आम्ही ज्या टुर तर्फे गेलो होतो त्यानीच म्हणजे श्रेष्ठा ट्रॅव्हल्स नेच सर्व व्यवस्था केली होती.

चीनी विसा तेच काढून देतात. पासपोर्ट नउ महीने तरी वैध लागतो. व्हिसा साधारण्पणे १४ दिवसांचा मिळतो. एका ग्रुप मधे जितकी माणसे त्या सगळ्याचा एकत्र विसा मिळतो. पासपोर्ट फक्त तपासला जातो चीनी स्टँप ग्रुप व्हिसा वर मारला जातो. आम्ही १८ लोक होतो. एका गाडीत चार माणसे जातात. (ग़ाडी लँडक्रुझर असते.) त्यामूळे चारच्या पटीत गेलात तर बरे असते.