मृण्मयी,
सुंदर कविता. एक 'चढाई'ची द्विपंक्ती वगळली, तर गझल म्हणायलाही हरकत नसावी.
मुख्यत: मला शब्दप्रयोग फार आवडले.
पिशाचलेल्या दिशा दहाही - वा! (पिशाच्चलेल्या असा छोटासा बदल सुचवावासा वाटला, मूळ शब्द पिशाच की पिशाच्च? कुसुमाग्रजांच्या 'कोण' या कवितेत 'पिशाच्च मी तव' असं आलंय.)
समुद्रपृष्ठी छड्या उमटतात पावसाच्या .... सुंदर!!! 'छड्या' विशेष.
फिरून आला ऋतू धरेच्या समर्पणाचा
पतिव्रतेचा टिळा कपाळी उगाच नाही.. वा! वा! वा!
- कुमार