नागरिक!

जसे पणनशास्त्र ग्राहकापासून सुरू होते तशी लोकशाही ही नागरिकापासून!

वर दिलेले सर्व घटक आहेतच,पण नागरिक सर्वप्रथम. त्याच्या हितार्थ पोलिस, न्यायालये. त्याच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व त्याला जाणीवा करून देण्यासाठी, जागृत करण्यासाठी वर्तमानपत्रे, त्याच्या वतीने व त्याच्या कल्याणार्थ राज्यकारभार चालविण्यासाठी संसद आणि राष्ट्रपती म्हणजे तर साक्षात प्रथम नागरिक.

चित्रपटात 'सत्तापालट' करून टाकू अशा गमजा खलनायकी छापाचे राजकारणी वा उद्योगपती करतात. पण प्रत्यक्षात क्वचित का असेना पण ते सर्वसामान्य नागरिकही करून दाखवतात. आणीबाणी नंतर काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि जनता राजवट आली तेव्हाचे लक्ष्मण साहेबांचे 'तो रागावलाय' हे व्यंगचित्र अजूनही आठवणीत आहे.