विठ्ठल.. या शब्दाची मी ऐकलेली उपपत्ती अशी आहे.
खरे तर विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे असे मानले जाते.
हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. (संदर्भ : कानडा वो विठ्ठलु, कर्नाटकू..)
कानडी भाषेत विष्णू या शब्दाचे बोली भाषेतील रूप ' इष्टु '
संदर्भ : सोलापूरची विष्णु-लक्ष्मी मिल. या मिलला पूर्वी ' इष्टु-फुटाणी मिल म्हणत '
इष्टु = विष्णु
( फुटाणीचा संदर्भ निराळा आहे. विष्णु मिल नंतर लक्ष्मी मिल बांधली गेली. त्या काळी भीषण दुष्काळ पडलेला होता. अर्थ व्यवस्थाही बिकट होती म्हणून मजुरांना मजुरीपोटी फुटाणे दिले जात. म्हणून तिला फुटाणी मिल म्हणत.)
इथे, इष्टु = विष्णु इतकाच संदर्भ विचारात घेऊ.
इष्टु या शब्दाचाच पुढे अपभ्रंश इष्टु > इठु > विठु.
पुढे विठूचे संबोधन विठ्ठलु > विठ्ठला
आणि मग ते ' विठ्ठल ' असे नाम झाले.
मी एकदा वारीला गेलो होतो तेंव्हा ही उपपत्ती एका वृद्ध वारकऱ्याकडून एकली होती.
बाकी चूक भूल द्यावी घ्यावी.