हे तुमचे मनोगतावर कदाचित पहिलेच लेखन असावे. चू. भू. द्या. घ्या.
मनोगतावर लिहिताना रोमन लिपी नाइलाज झाल्यासच वापरावी असे धोरण आहे. शक्यतो आपले लेखन मराठीत भाषांतर करून किंवा शक्य नसेल तर देवनागरीत आणि अगदीच नाइलाज असेल तेथे (उदा रसायनशास्त्रातली सूत्रे) रोमन अशा प्रकारे लेखन करावे असा कटाक्ष आहे.
वरच्या तुमच्या लेखात मॅडम, डेमो, लॅब, सॉफ्टवेअर इत्यादी शब्द लिहिताना ही काळजी आपणहोऊन घेतलेली आहे हे अभिनंदनीय आहे. बाकीचेही लेखन बदलायला एक दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला असता असे वाटत नाही.
कळावे.