इ‌.स. १२७५ मध्ये सोलापूर पंढरपूर हा भाग राजकीय आणि भाषिकदृष्ट्या कर्नाटकातच गणला जात असावा.
त्यावेळी किंबहुना बऱ्याच नंतरच्या काळातही शिवाजी महाराजांच्या काळातही महाराष्ट्र म्हणजे मराठी बहूभाषिक आणि राजकीय भाग देवगिऱी- पैठण- नाशिक - पुणे - मावळ - सह्याद्रीलगतचा प्रदेश असाच गणला जात असे असे वाटते.
त्यामुळे कानडावो विट्ठलू कर्नाटकू - हे त्याकाळच्या कर्नाटकातील कानडी दैवताबद्दलच ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.

कर्नाटक शास्त्रीय संगीताचा प्रणेता पुरंदरदास हा विजयनगरच्या साम्राज्यातील फारच मोठा संतपुरूष इ.स. १५०० च्या आसपास होऊन गेला. त्याची "पुरंदर विट्ठलू" ला आळवणारी कानडी भजने तुकारामांच्या अभंगांइतकीच प्रसिद्ध आहेत.(हा पुण्याजवळच्या एका गावात एक दुष्ट सावकार होता. पुढे उपरती होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला तसे त्याचा संत  पुरंदरदास झाला असे वाचल्याचे स्मरते. चु.भू.द्या̱.घ्या.)

विष्णू - विण्हू - विट्ठलू ही उपपत्ती सर्वज्ञात आहे.