नुसत्याच कल्पना पुरवायच्या असतील तर माझ्याही काही. पण हे सारे करताना प्रकाशकांन काय त्रास होईल याचीच काळजी वाटते..

१. ज्याचे सभासदत्व वावर ठराविक मर्यादेपेक्ष्या जास्त आहे त्यांना मतप्रदर्शनाचा अधिकार द्यावा.

२. प्रत्येकाला आपल्या समविचारी मनोगतींची यादी बनवण्याचा अधिकार असावा. trusted raters!

३. आपल्या सार्‍या निवडलेल्या समविचारी मनोगतींनी दिलेल्या गुणांचीच सरासरी फक्त आपणास दिसेल असे करावे. (आता हे नक्की कसे करावे, हा तज्ञांचा विषय!)

४. अर्थात प्रत्येकासाठी ही स्वतंत्र गुणतालिका सांभाळावी लागेल प्रकाशकांना! customised ratings

५. प्रत्येकाची गुण तालिका निराळी असल्याने ज्याला त्याला आपल्या आवडीनिवडीप्रमाणे लेख/कविता पाहता येतील.

६. ज्यांना अधिकच आकडेवारीत रस असेल त्यांना absolute गुणतालिकाही उपलब्ध करून दिली की झालं.

७. शिवाय प्रत्येकाचे गुण हे सापेक्ष असल्याने कवी वा लेखकाचा हिरमोडही होण्याचे कारण नाही व उपद्रवकारी बहुसंख्य किंवा रोज नवे नाव धारण करणार्‍या मनोगतींचाही या प्रणाली वर परिणाम होणार नाही.

सध्या मी थांबतो. आता हे सारे करायचे कसे यावर प्रकाशकांना थोडा विचार करण्यास वेळ द्यावा म्हणतो..

मी आशुतोष