मला तर हि "प्रथम"ची परंपरा वगैरे लिहिलेले म्हणजे बादरायण संबंध सारखे वाटते,उगीच आपले काही तरी शोधून काढायचे झाले... श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या रूपे पहिल्या मराठी महिला राष्ट्रपती झाल्या हे खरे, पण म्हणून उगीच सगळ्याच बाबतीत महाराष्ट्राची "प्रथम"ची परंपरा आहे म्हणणे मला पटत नाही, या प्रकारे स्वतःची पाठ थोपटवून घेऊन इतर राज्यांकडून हसे करून घेण्या सारखेच आहे. एवढे मोठे राज्य आहे, बऱ्याचं गोष्टी या पहिल्या वगैरे व्ह्यायच्याच,त्यात "परंपरा" वगैरे नक्कीच नाही हं. त्यांच्या नावाची शिफारस हि एक राजकीय खेळी होती, महाराष्ट्राचा/महिलेचा सन्मान वगैरे काही नव्हते (असे मला तरी वाटते...), आहो आज पर्यंत महाराष्ट्राचा एक पण पंतप्रधान झाला/होऊ दिला नाही अजून दिल्लीने...हो पण हे म्हणाल्याने माझा मराठीचा अभिमान आणि श्रीमती प्रतिभा पाटील यांचे कौतुक/महत्व कमी होत नाही...

जय महाराष्ट्र !!!
(परंपरागत मराठी) बंड्या...