अंजलीताई,
आपण अत्यंत छान मुद्दा घेतलात चर्चेला. अभिनंदन!
मी जेव्हा इंग्रजी संकेतस्थाळांवरील गुणांची अशी सोय असणार्या विषयांमध्ये जाऊन पाहतो तेव्हा बर्याच वेळी अपेक्षाभंग होतो. कारण काही चांगल्या लेखांना खूप कमी गुण लाभलेले असतात. उदा. देशाच्या सुरक्षिततेविषयी, समाजाविषयी, वगैरे. तर कोण सिनेतारका किती जाड झाली, या सिने नायकाला खायला काय आवडते, तो महानायक (?) शिंकला म्हणून त्याला सर्दी झाली वाटते अशा आशयाच्या लेखांना चांगले गुण मिळालेले असतात.
प्रत्येक व्यक्तीचे विषय वेगळे असतात. उदा. क्रिकेट वा सिनेतारकांच्या शिंकणे अशा विषयांना मी शुन्य गुण देईल. तर माझ्या या गुणांमुळे करोडो क्रिकेट शौकिनांवर अन्याय होईल. तसेच मला महत्वाच्या वाटणार्या सामाजिक मुद्द्यांवर काही अपवाद वगळता मला सामान्यपणे उदासिनता जानवते.
आणखी एक धोका आहे तो विघ्नसंतोषी सभासदांचा. आजकाल कोंबडे, चोर, दरोडेखोर (काही नावे लिहवत नाहीत अशी अश्लील आहेत) इत्यादींचा सुळसुळाट आहे. अशा उपद्रवी लोकांनी गलिच्छ लेखांना उचलून धरणे सहज शक्य आहे.
हे लिहिण्यामागील माझा उद्देश हाच की काय वाचायचे व काय सोडायचे हे आपले आपण ठरवले तर जास्त योग्य.
नवीन सोयींसाठी विचार करताना मनोगतचा साधा सुटसुटीत साचा क्लिष्ट होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायला हवी.
आपला,
(मनमोकळा) भास्कर