हॅरी पॉटरचे नवीन पुस्तक घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या हे खरे आहे पण 'त्या' रांगांचा वारकऱ्यांना ना मत्सर वाटतो ना हेवा. आणि हॅरीबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली असताना पुस्तक खरेदीसाठी रांगा लावण्यात काय चुकले?
कृपा करून वारकरी आणि हॅरी पॉटरचे चाहते यांची सरमिसळ करू नये. नावातल्या साधर्म्याशिवाय त्या दोन्हीमधे काहीही साम्य नाही.
गंमत म्हणून हॅरी पॉटर च्या चाहत्यांना 'हॅरी भक्त परायण' म्हणणे वेगळे पण वर आपल्या कवितेत आपण जो उल्लेख केला आहे तो जास्त गंभीर स्वरूपाचा आहे. शाब्दिक कोट्या करताना कुठे थांबावे हे कळणे हे माझ्या मते खरे महत्त्वाचे असते.
शिवाय पंढरीची वारी आणि दरवर्षी नेमाने वारी करणारे वारकरी यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात अत्यंत आदर आहे आणि तो असायलाच हवा. कुठलाही हॅरी पॉटर चा चाहता वारकऱ्यांना वेडा म्हणणार नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
--अदिती