वेगळा विषय, चांगली मांडणी
अहो, 'जमण्या' च्या यादीतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमप्रकरण, किंवा जनसामान्यांच्या भाषेत 'लफडं'!. 'बरेच दिवस नुसतंच 'आंखो आंखो में' चाललं होतं, एकदा मनाचा हिय्या करुन त्यानं विचारलं, तिनंही लगेचच 'हो' म्हणून टाकलं आणि मग त्यांचं 'जमलं'! 
आणखी एक 'जमणारी' गोष्ट म्हणजे पान! चमचमीत (शक्यतो सामिष) जेवण झालेले असते, आईसक्रीम किंवा रसमलाईने हुळहुळणारे तोंड शांत होते, पाय मोकळे करायला नेहमीच्या ठेल्यापर्यंत गेलो की पंडीत "हां साब, आपका पान..." म्हणून पान लावायला घेतो. मग ते खानदानी फूलचंद असो की रंगेल बनारस एकशेवीस तीनशे, सादा पूना पट्टी आणि भक्कम तंबाखू असे मर्दमराठे असो की मघई जोडी असे वरणभाती.... बत्तीस वेळा चावून झाले आणि तंबाखूशौकीन मंडळींची पहिली पिंक पडली की मग ते 'जमते'! 
(हा लेख 'थोडासा वाढवून आणि सगळ्या 'ईं' चे 'इ' करून 'मनोगत दिवाळी' अंकात मस्त 'जमला' असता! असो!)