त्रिधारा अंतर्गत रेस्टॉरंट, मिशन चॅम्पियन व नितळ असे तीन चित्रपट दाखवण्यात आले. मी फक्त नितळ बघू शकले. मला नितळ आवडला. रिमा लागू, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, दिपा श्रीराम, विजय तेंडुलकर, ज्योती सुभाष, नीना कुलकर्णी सारख्या दिग्गज कलाकारांचा व नवोदित कलाकार देविका दफ्तरदार व डॉ कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय आणि सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकरचे दिग्दर्शन! मिशन चॅंपियनही आवडलयाच बऱ्याच जणांनी सांगितलं.