आजपर्यंत ४ लायसन्स झालेत. १६ पूर्ण ला बिना गिअरची स्वयंचलित दुचाकी, १८ पूर्ण ला गिअरची आणि नंतर चारचाकीचे व त्यानंतर आंतरराष्ट्रीय परवाना. चारचाकीचा परवाना पक्का ड्रायव्हींग स्कूल मधून गेल्यामुळे कटकटीशिवाय झाला. पण  बाकीच्या गोष्टींसाठी ठराविक कामकाजाची फी वगळता काहीही जास्तीचे कुणाला दिले नाही. कुठल्याही दलालाला गाठले नाही. कधीही कागदपत्र योग्य नाहीत म्हणून खूप वेळ रांगेत उभे राहून काम न होताच घरी परतण्याची वेळ आली नाही. परीक्षा दिल्यानंतर पक्क्या परवान्याची पावती लगेच व परवाना ४-५ दिवसात हातात आला आहे.