मस्त लिंक दिलीस सागर. खूप माहितीपूर्ण लेख आहे. आणि वाचतना कंटाळाही नाही आला. त्या लेखातली सगळी माहिती तू दिली नाहीस. पण इंटरेस्ट निर्माण करायला चंगली होती.
त्या लेखात म्हटले आहे - जितक्या माणसांचे जीव उंदरांनी घेतले असतील तेवढेच त्यांनी वाचवलेही आहेत.
ह्याचा नीट अर्थ नाही कळला. म्हणजे उंदरांवर प्रयोग करून औषधे बनवून त्यांनी माणसांचे प्राण वाचले असे म्हणायचे आहे का?
बुडत्या जहाजातून उंदीर आधी पळतात हे मीही ऐकलेले. मी असेही ऐकलेले की वादळ येणार असेल तर सगळे उंदीर बोटीच्या तळातून वर डेकवर येतात.