चारचाकीचा परवाना फारशी कटकट न होता झाला. ड्रायविंग शाळेच्या मास्तरांनी मेजाखालून काही व्यवहार केले असल्यास मला ठाऊक नाही!

आंतरराष्ट्रीय परवाना काढतेवेळी मात्र, किमान १००० रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे काढण्याची सक्ती झाली. मी नेट धरल्यावर ती रद्द होऊन मला परवाना मिळाला ही गोष्ट वेगळी. कदाचित, वाहतूक अधिकाऱ्याचा (वा त्यांच्या पत्नीचा) गुंतवणूक जोड-धंदा असावा!