बैरागीबुवा,

कविता आवडली.

वृत्ताबद्दल -मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे मला मुक्तछंद नीट माहिती नाहीये; पण तो 'छंदमुक्त' कवितांपेक्षा निराळा आणि नियम पाळणारा आहे असं कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं.

तुमच्या कवितेत ते नियम दिसतात, फक्त संपूर्ण कवितेत / कडव्यात / दोन सलग ओळींत सारख्या मात्रा असतील असं नाही.  त्यामुळे मला वाटतं ही कविता हे एक मुक्तछंदाचं उदाहरण होऊ शकेल आणि त्यात 'अंगठ्यापाशी' या शब्दात घेतलेल्यासारखी क्वचित सूट घ्यायलाही मुभा असावी.

- कुमार