कविता ठीक वाटली. कवितेचा आशय कळला, कल्पना आवडली. पण कल्पनेतले सौंदर्य ओळींमधून व्यक्त होण्यात शब्द कुठेतरी कमी (की जास्त?) पडले, असे वाटले. शब्दबंबाळ नाही म्हटले, तरी एकूण शब्दयोजना अतिसर्वपरिचित (सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास 'टिपिकल') वाटली. त्यामुळे 'अतिपरिचयादवज्ञा...' सारखा प्रकार या शब्दरचनेच्या बाबतीत होतो आहे काय, याचा विचार करावासा वाटतो.

'हिरवा दिवा' मलाही कळले नाही. वाट'सुधा'बाबतचा वाद डोक्यात आहेच, आणि 'तो-तो' बाबतही विचार चालू आहे.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.