सर्व मनोगतींचे मन: पूर्वक आभार. हा विषय खरेतर खूप मोठा आणि गहन आहे. तरीही नेताजींवरील श्रद्धेपोटी लिहायाचा प्रयत्न करत आहे. एक सच्चा देशभक्त आणि त्याच्या साठी तळहातावर शीर घेउन देशासाठी लढणारी आझाद हिंद सेना हा उभ्या हिंदुस्थानला अभिमानाचा विषय असला तरी अजूनही काही लोक त्यांच्या देशभक्ति विषयी साशंक अहेत. कुणाला या सेनेने असे काय केले? हा प्रश्न आहे तर कुणाला ते परक्यांच्या हातचे बाहुले वाटले. या महान संघटनेचा आणि महानायकाचा परिचय म्हणुनच करुन द्यायचा हा प्रयत्न.

कसे जमते ते बघू.