मी वाचलेली उत्पत्ती अशी....
पुंडलिक विष्णूचा जप करत असताना आई-वडिलांची सेवाही करत होता. त्याच वेळी त्याला भगवान प्रसन्न झाले आणि त्याला हाक मारली. पण पुंडलिक सेवेत इतका गढलेला होता की त्याला कोण आले आहे हे पहायला वेळही नव्हता. त्याने जवळ पडलेली एक विट ऊचलून देवाकडे फेकली आणि त्यावर उभे राहण्यास सांगितले.
देव अजुनही विटेवर उभा राहून पुंडलिकाची वाट पाहतो आहे पंढरपुरात! विटेवर उभा आहे म्हणून "इट्टल." त्याचा अपभ्रंश "विठ्ठल."