सर्वसाक्षी,

रोचक आणि दमदार लेख आहे. प्रवाह सुद्धा सहज आहे. सचित्र वर्णनामुळे घटना डोळ्यासमोर घडल्यासारखे वाटते.

शाळेत शिकलेल्या आणि जणू तिथेच राहिलेल्या इतिहासाला उजळणी मिळाली. छान वाटले.

एकच गोष्ट खटकली,  ती म्हणजे गांधींचा उल्लेख.

तशी मी गांधींची समर्थक नाही. मी सुद्धा जहाल मताला समर्थन देते. परंतु, नेताजींचे गौरवगान करण्यासाठी इतर कुणावर टिका नसावी असे वाटले.

हे माझे वैयक्तिक मत आहे. ते किती योग्य ते माहिती नाही. जे वाटले ते लिहिले.