अतिसुंदर. शब्दांवरची एक दर्जेदार कविता. श्री. रा.वा. गुणेंच्या कविता चांगल्या आहेत.
फक्त एकच मागणे -
सुबोधिनी, आपण करत असलेल्या मध्यकेंद्रित टंकलेखनामुळे कविता सकृतदर्शनी अनाकर्षक वाटते.
कवितेच्या बाजाप्रमाणे टंकलेखन करावे. त्यामुळे (नेहमीची उपमा) हिऱ्याला उत्कृष्ट कोंदण मिळेल.
म्हणजे - अभंग अभंगासारखा लिहावा -
उदा.- (फक्त उदाहरणास्तव)
लिहुनिया अभंग एक। तुकयाचा होईन लेक।
जगामाजी मिरविन देख। जातकुळी माझी॥१॥
असा.
किंवा मुक्तछंद - (वरची कविता)
भावनांचे कल्लोळ जेव्हा
मनाच्या भिंतीवर खळाळू लागतात,
विचारांचे थैमान जेव्हा
मानसलहरींना धक्के देऊ लागते,
तेव्हाच आठव होतो आम्हाला तुमच्या
चिरतन दिव्यतेच्या अस्तित्वाचा....
असा लिहावा.
कृपया विचार व्हावा.