चमत्कार असेलही नसेलही. पण अमेरीकेत आणि तेही हॉस्पिटलात मांजर? स्वच्छता वगैरेचे नियम धाब्यावर बसवले का? वर कोणीतरी म्हणालं ते अगदी खरं आहे. भारतात घडलं असतं तर दुनियेभरच्या सगळ्यांनी अंधश्रद्धा म्हणून बोंब उठवली असती. आता अमेरीकेत घडलं म्हणल्यावर मेडिकल जर्नलस आणि बोस्टन ग्लोब इत्यादींनी इतक्या गंभीरपणे दखल घेतली पण एकानेही मुळातच हॉस्पिटलात मांजर कुठेही फिरू शकते याबद्दल काही म्हणल्याचे दिसत नाही.