या लेखमालेत अश्या प्रकारच्या स्थानकालाही भेट द्यावी लागेल अशी अपेक्षा होती आणि तसेच घडले. गांधीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विसंगतीचाही आढावा घ्यायला हवा.
उदा. चौरीचौराचा लढा. गांधींनी अगोदच ठरवल्याप्रमाणे हा लढा अहिंसक पद्धतीने चालवायचा असा स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही हिंसा घडल्यामुळे एक नेता म्हणून गांधींना लढ्यासाठी अजून आपण बरोबर तयारी केलेली नाही हे मान्य करून चांगली चळवळ मागे घेतली. एक नेता म्हणून त्यांचा हा अधिकार मान्य करायला(च) हवा. यात प्रतारणेचा संबंध कोठे आला? उलट यामुळे भारताचे नैतिक वर्चस्व नकळतच ब्रिटिशांना मान्य करावे लागले. त्यापर्यंत ब्रिटिशांचा असा दावा होता की भारतासारख्या मागासलेल्या देशावर आपण राज्य करून त्यांना उपकृत करत आहोत. परंतु एका व्यक्तीने तत्त्वासाठी लढा मागे घ्यावा आणि सर्वांनी तो विनातक्रार मान्य करावा त्यामुळे गांधी चे नैतिक नेतृत्व नकळतच जगापुढे मान्य झाले.
गांधींचा अभ्यास रूढ चौकटीत केला तर रूढ नित्कर्ष मान्य करावे लागतील हे सर्वसाक्षींनी जर लक्षात घेतले तर नक्कीच वेगळी वाट चोखाळून ते काही वेगळे नित्कर्ष मांडू शकतील.
एक गांधीप्रेमी म्हणून मलाही नेहमीच वाटत आले आहे की गांधीकडून सुभाषबाबूवर अन्याय झालेला आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सुभाष आणि गांधीमध्ये वैर होते. उलट नेताजींची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी गांधींना दिलेली राष्ट्रपिता ही पदवी आणि सर्व राष्ट्राने या पदवीला मनापासून स्वीकारली. ही पदवी त्यांनी आझाद हिंद सेनेचा लढा तीव्रतम असताना दिली हे लक्षात घ्यायला हवे.
या लेखमालेत आता अशी स्थानके येणार नाही अशी मला अपेक्षा आहे.
द्वारकानाथ