प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
@चित्त
अगदी 'दिलसे' आले आहेसे वाटते. तुम्ही विडंबने करीत जा. भावना पोचवत जा. आम्ही वाचत जाऊ.
हो हो! अगदी 'दिलसे' रेऽऽऽ ... खरं म्हणजे समस्त नवरोबांची स्तुती करण्याची इतकी चांगली संधी सोडायची नव्हती.
@केशवसुमार
प्रियालीताई, येऊ देत अजून विडंबने.. लोक केशवसुमार सहन करतात तसे तुम्हाला ही करतील.. :)
करतील हो सहन कदाचित मलाही... तशी मनोगतींची सहनशक्ती अफाट आहे पण मलाच त्यांच्यावर दया करावीशी वाटते तेव्हा सध्या एक केशवसुमार भारी आहे , असे अंतःकरणावर घाव बसले
तर लिहिन म्हणते कधीतरी.
@मानस
उत्तम विडंबन.. काव्य लेखन गंभीर पणे घ्यावे.... जमेल नक्की
धन्यवाद. पहिलाच प्रयत्न असल्याने खपवून घेतले सगळ्यांनी पण पुढचे प्रयत्न वृत्तबद्ध हवेत ना, तिथे मी पार "ढ" आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
- प्रियाली.