बातमी रोचक आहे. हे भारतात झाले असते तर प्रतिक्रिया वेगळी झाली असती. याचे कारण म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनसारख्या विषयांवर संशोधन होत नाही (माझ्या माहितीप्रमाणे, चूभूद्याघ्या). दुसरे म्हणजे असे काही झाले की लगेच त्याचा संबंध धार्मिक गोष्टींशी लावून लोक भक्ती करायला मोकळे होतात. (हे काही प्रमाणात तिकडेही होते, पण चिकित्सक वृत्तीने याकडे बघणारे लोक तिकडे जास्त असतात.) आपल्याकडे दोन टोके आहेत, एक सगळ्यावर श्रद्धा असणारे आणि दुसरे विज्ञानवादी.
पाश्चात्य देशातही यावर बरेच वाद आहेत. एखादी गोष्ट जर विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर त्याबाबत संशोधन करायचे की असे काही नाही म्हणून पडदा टाकायचा? ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रिंस्टन विज्ञालयातील पॅरासायकॉलॉजीची प्रयोगशाळा बंद करण्यात आली त्यावेळी हे प्रश्न अजून सुटलेले नाहीत हे प्रकर्षाने जाणवले. http://www.csicop.org/si/2007-03/pear.html
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन ने हे छापले हे विशेष आहे. नाहीतर शास्त्रविषयक मासिके अशा विषयांपासून फटकून असतात.
हॅम्लेट