आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनसारख्या विषयांवर संशोधन होत नाही (माझ्या माहितीप्रमाणे, चूभूद्याघ्या). दुसरे म्हणजे असे काही झाले की लगेच त्याचा संबंध धार्मिक गोष्टींशी लावून लोक भक्ती करायला मोकळे होतात. (हे काही प्रमाणात तिकडेही होते, पण चिकित्सक वृत्तीने याकडे बघणारे लोक तिकडे जास्त असतात.)
सहमत आहे. आपल्याकडे याचा संबंध मांजराच्या अंगात साक्षात "क्ष" गुरू येतो किंवा देव येतो अशा वावड्या आधी उठायला सुरूवात होते. वरील बातमी सध्या अमेरिकेत फारच प्रसिद्धी पावते आहे. अशा प्रकारच्या इएसपी शक्तींकडे पाश्चात्य समाजात खुल्या दिलाने पाहिले जाते.