मला भीती वाटते ती एकाच कारणामुळं: भाषा कधीही एकटी येत नाही, भाषा तिच्यासोबत तिची संस्कृती घेऊन येते.

ज्या घरात हे अजूनही सहजपणे होतं, ते मराठी माणसाचं घर... तिथली माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तरी...

हे घडण्याची कितपत शक्यता आहे असा प्रश्न मनात डोकावतो. जर त्या घरातील माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तर तिथे 'ये रे ये रे पावसा' च्या ऐवेजी 'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार' ऐकू येण्याचीच शक्यता जास्त!

का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

मनोगतवरील एका 'प्रातिनिधिक' मराठी माणसाला ही भीती तरी नक्कीच नसेल. 'व्यवहारासाठी इंग्लिश आणि मनात मराठी' ही आपल्यापैकी बऱ्याच जणांची अवस्था असावी असे वाटते.
ते ओझं आणि ते दडपण झुगारताना आपलं मराठीपण हरवतं आहे का, हे सुद्धा बघायला हवं.

आपल्या पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार आहोत, हा प्रश्नही चर्चिला जावा...