अरुणराव,
२२ व्या भागापासून पुढे सर्व भाग आत्ता ओळीने वाचले. प्रतिसादात अनेकांनी आपले आपल्या शैलीचे कौतूक केले आहे ते सार्थ आहे असे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते. हा शेवटचा भाग असेल असे वाटले होते आणि शेवट कसा करणार याची उत्सुकता होती. आपल्याला सलाम !
वाचून डोळे पाणावले.
'हरुन' चा शेवट सुखान्त झालेला वाचून 'भरुन' पावलो!
अनु म्हणतात त्याच्याशी पूर्ण सहमत ! (तसेही भारतात जायचे म्हटले की डोळे पाणावतातच.)
आपले हे अनुभवकथन खरोखरच दर्जेदार आहे. मागच्या कोठल्याशा प्रतिसादात संजोप राव म्हणतात त्याप्रमाणे आपल्या विनयशील स्वभावाचे सुद्धा त्यात दर्शन घडते.
पुढील लेखनास शुभेच्छा !
--लिखाळ.