ऐतिहासीक घटनांचा मागोवा काढताना अनेक साधक बाधक गोष्टी पुढे येउन ठकतात. काही स्तुतिपर तर काही टीकात्मक. पण जोपर्यंत त्या सत्याला धरुन आहेत आणि व्यक्तिवर नसुन प्रवृत्तीवर आहेत तोपर्यंत त्या स्विकारायला हरकत नसावी. उगाच अमक्याने केले म्हणजे ते शिरोधार्थ अशी व्यक्तिपूजात्मक भूमिका असू नये तसेच अमक्याने केले ते सगळे वाईट असाही ग्रह असू नये. जर काही अनाठायी वा असत्य लिहिले असेल तर अवश्य नजरेस आणून द्या.