द्वारकानाथजी,

केवळ आपल्याला पूज्य अशा गांधींनी केले म्हणजे ते समर्थनिय हे बरोबर नाही. नेत्याचा अधिकार सांगितलात, मग कर्तव्याचे काय? आपण काय करणार आहोत, आपले अनुयायी कोण, त्यांना ते कितपत मान्य आणि वर्तनिय आहे हे नेत्याने तपासून पाहणे हे त्याचे कर्तव्य नाही का? आपल्या शब्दाखातर आंदोलनात सर्वस्व झोकुन देणाऱ्यांना न विचारता केवळ त्यांना वाटले म्हणून एखादे गाजावाजा केलेले आंदोलन असे तडकाफडकी गुंडाळण्याचा त्यांना काय अधिकार? आणि त्यांनी ते मागे घेतले तर काय भले झाले? इंग्रजांनी त्या बदल्यात काय दिले? बरे याच परिच्छेदातील इतर प्रश्नांची दखलही घ्यावी व असल्यास उत्तरे द्यावीत.

इंग्रज व हिंदुस्थान यात कायमच नैतिक विजय हिंदुस्थानचा आहे कारण गोऱ्यांनी हिंदुस्थानवर धनाच्या लोभाने आक्रमण केले व कमकुवत दुवे हेरून अंकित केले हे जगजाहीर आहे.

<एक गांधीप्रेमी म्हणून मलाही नेहमीच वाटत आले आहे की गांधीकडून सुभाषबाबूवर अन्याय झालेला आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सुभाष आणि गांधीमध्ये वैर होते. उलट नेताजींची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी गांधींना दिलेली राष्ट्रपिता ही पदवी आणि सर्व राष्ट्राने या पदवीला मनापासून स्वीकारली. ही पदवी त्यांनी आझाद हिंद सेनेचा लढा तीव्रतम असताना दिली हे लक्षात घ्यायला हवे.> लाख बोललात! यांतच सुभाषबाबूंच्या मनाचा मोठेपणा व त्यांच्यातला सच्चा देशभक्त दिसुन येतो. वैर गांधींनी मांडले हे ऐतिहासिक सत्य आहे जे कुणीही नाकारु शकत नाही.

<गांधींचा अभ्यास रूढ चौकटीत केला तर रूढ नित्कर्ष मान्य करावे लागतील हे सर्वसाक्षींनी जर लक्षात घेतले तर नक्कीच वेगळी वाट चोखाळून ते काही वेगळे नित्कर्ष मांडू शकतील.> म्हणजे असेच ना की "माझा लोकशहीवर संपूर्ण विश्वास आहे, नेता हा सर्वमताने निवडला गेला पाहिजे, चला सर्वांनी निर्भयपणे मतदान करा. हो, मात्र एक अट आहे; मतपत्रिकेवर केवळ माझेच नांव असले पाहिजे"

द्वारकानाथजी, सत्याला सामोरे जा.