पुढचा भाग लवकर टाका. वाचून मजा वाटली कारण हीच गोष्ट आमच्या घरातही होते आणि होत राहणार. काँट्रॅक्टमध्ये बसत नाही, सध्या घर लहान आहे, घरात साफ कोण करणार? असे अनेक प्रकारे समजावून झाले नंतर रीतसर एकदा १८ वर्षांची झालीस की तू आणि कुत्रा दोघे वेगळे राहा असे "समजावून" झाले पण हे कुत्रा वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डॉग्झ नावाचा विडिओ गेम खेळून "नाव आय कॅन टेक केअर ऑफ माय पपी." असे डोस आम्हाला पाजले जातात.
"फारतर १२-१३ वर्षांपर्यंत थांबेन, नंतर कुत्रा आलाच पाहिजे." असे आम्हालाच ठणकावून सांगितले जाते. गेल्यावेळी देवळात "देवा, डॅडीला सुबुद्धी दे आणि घरात लवकर पपी येवो," ही प्रार्थना यांच कानाने ऐकली आहे. (नो किडींग!)
सध्या तरी कुत्रा घरात आणण्याचे ठरलेले नाही भविष्यात तो प्रसंग येईल असे वाटते पण बिरबलाच्या खिचडीप्रमाणे आम्हीही नावे पकवत असतो - पांडा, पांडु, स्कूबी डू, कुकी, बिस्किट इ. इ.