अशा प्रकारच्या प्राण्यांना ''ट्रान्सजेनिक ऍनिमल्स असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाची ही एक मोठी देणगी आहे. आईच्या दुधात लॅक्टोफेरीन नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे नवजात बालकांना डायरियापासून संरक्षण मिळते ('हगवण' हा शब्द वापरायला नको वाटतो!). ज्या बालकांना काही कारणांनी आईचे दूध देणे शक्य नसते त्यांना असे 'ट्रान्सजेनिक मिल्क' दिले जाते. अशाच तंत्रज्ञानाचा वापर करुन लोहाचे प्रमाण वाढवलेला तांदूळ (जो भारतातल्या करोडो ऍनिमिक स्त्रियांसाठी वरदान ठरेल!), 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवलेला 'गोल्डन राईस' (ज्यामुळे लक्षावधी बालके नेत्रहीन होण्यापासून वाचतील) अशी बरीच उत्पादने आहेत. काही कारणांमुळे बी टी कॉटन सोडून यातले एकही उत्पादन वापरायला अद्याप भारत सरकारने परवानगी दिलेली नाही.
फारा दिवसांनी स्वतःच्या विषयावर लिहायला मिळाले. धन्यवाद, सागर!