मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे मिळाली. या चर्चेला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व मनोगतींचा आभारी आहे. माझ्या प्रतिक्रिया थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत.

१. अजुनही ज्ञानेश्वरांच्या अभंगच्या संदर्भात मला कानडा या शब्दाचा कन्नडभाषी असा अर्थ पटत नाही. देवाला कधी भाषा नसते. भक्त मंडळी निरनिराळ्या भाषा बोलतात.

२. विष्णू या शब्दापासून विठू होण्यासाठी मधल्या इष्टू या अपभ्रंशाची गरज लागू नये.